Tuesday, October 30, 2018

ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून तुर्तास मान्यता



सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश
1 कोटी 91 लाख रुपये निधीची केली होती शासनाकडे मागणी
शासनाकडून वीज बिल थकबाकी व सोलर प्लाँटचा समावेश करण्याबाबत सुचना

उस्मानाबाद,दि.25:-  तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळा, ऐडशी या चार गावाला  पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद पडली होती, ही योजना सुरू करणेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वारंवार प्रयत्न करण्यात येत होते, दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  तंत्रीक समितीचे बैठक झाली या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांतच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत शासनाच्या वतीने माहिती मागविण्यात आली होती, त्या अनुषंगाने दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रीक समितीची बैठक झाली. या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करणेच्या सुचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही योजना सुरू होण्यास अंतीम मान्याता लवकरच मिळणार असल्याने चार गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
         उस्मानाबाद तालुक्यातील ढोकीसह चार गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून 2006 मध्ये चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली तब्बल 16 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली. योजनेद्वारे तेर ढोकी तडवळा ऐडशी आदी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. नंतर जुन 2015 ला धरणातील पाणीसाठा संपला त्यामुळे योजना बंद पडली नंतरच्या काळात 2016 मध्ये धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला परंतु योजनेवरील थकीत विज बिल देयकामुळे कनेक्शन तोडण्यात आली नंतर योजना पाणी असताना देखील योजना सुरू झाली नाही, दि. 16 मे रोजी शासनाने एक परिपत्रक काढले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सार्वजणीक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत त्यामुळे योजना बंद पडत आहेत त्यामुळे या देयका वरील 50 टक्के रक्कम व वीज माफ करून स्थानिक स्वराज्य संस्थाला मिळणाऱ्या 14 व्या वित आयोगाच्या निधीतून थकीत वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात आली. नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला चार गावाला मिळणारा 14 व्या वित आयोगाच्या निधीतून ऊर्जा विभागाला 50 टक्के विज बिलाचे थकीत रक्कम वर्ग करून घेण्यात यावे असे पत्र पाठवून दिले व दि.4 ऑगस्ट 2018 ला चार गावातील पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी साठी (नविन जलकुंभ बांधकाम करणे, नविन वॉल्ह टाकणे, नविन पाईपलाइन टाकण्या साठी असे विविध कामांसाठी 1 कोटी 91 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागांकडे जिल्हा परिषदेच्या वतीने पाठवण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 आक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्यात तुर्तास मान्यता दिली आहे या अनुषंगाने सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे सुचनाही दिल्या आहेत.
"बैठकीत झालेल्या चर्चे व घेण्यात आलेली निर्णय"
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट केलेल्या 83 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी पुनरूज्जिवीत  करावयाच्या योजनांचा व समाविष्ट नाहीत मात्र पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे अशा सर्व योजनांचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी व चार गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत खालील अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली - प्रस्तावित योजनेत समाविष्ट सर्व गावातील लाभार्थ्यांकडुन हमीपत्र घेण्यात यावे, हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या गावाने पाणी घेण्यासाठी नकार दिला तरी त्यांच्या कडून 75 टक्के पाणी पट्टी वसुल करण्यात यावी. याबाबत ग्रामस्थांना निविदा प्रक्रिया करण्या आगोदरच कल्पना देण्यात यावी, सदरील योजनांवर सोलार पॅलेटचा व बल्क मीटारचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या अंदाजपत्रकात MSEB च्या थकीत वीज बिलाचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावे, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संदर्भात बैठकीत योजना सुरू करणेसाठी अखेरचे मान्यता मिळणार आहे.  
ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून तुर्तास मान्यता मिळाली आहे. सुधारीत अंदाजपत्रक यामध्ये 1 कोटी 54 लक्ष रूपयांचे सोलार पॅलेटचा व बल्क मीटरचा समावेश करण्यात आला तसेच MSEB चे थकीत विज बिल 88.21 लक्ष असे नव्याने समावेश करण्यात आला आहे. पुर्वीचा व आताचा असा मिळून चार कोटी 43 लक्ष रुपयेची सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांतच पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अखेरची मान्यता मिळेल. यामुळे मुख्यता वीज बिलामुळे बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुधारित धोरणामुळे कार्यान्वयीत होणार आहे.
*****



जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूरी बंधारे दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपये मंजूर



उस्मानाबाद.दि.24:- जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भौगोलीक परिस्थीतीचा विचार करुन माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधले होते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तसेच जिल्ह्यातून एकही मोठी नदी जात नसल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे 1022 बंधारे, 513 पाझर तलाव व 126 साठवण तलाव बांधले होते. जलसंवर्धनाचे महत्व लक्षात घेवून जलयुक्त शिवार करण्यासाठी त्यावेळीच डॉ. साहेबांच्या दुरदृष्टी नेतृत्वाने कामे पूर्ण केली होती. परंतु त्यावेळी लोकांना याचे महत्व न कळल्यामुळे या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. हे बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदे मार्फत याचा दोन अभियंत्यामार्फत सर्व्हे करण्यात आला व यासाठी करावयाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला व त्यानुसार निधी उपलब्ध करावा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या कडे निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूरी बंधाऱ्याची स्थापत्य दुरुस्ती, गेट दुरुस्ती व नवीन गेट खरेदी आदी कामे करण्यात येणार असून यामुळे 96 हजार 874 स.घ.मी. इतका पाणीसाठा पुनर्स्थापित होऊन सुमारे 30 हजार 112 हेक्टर इतके क्षेत्र सिंचन पुनर्स्थापित होणार आहे.
जिल्ह्यातील ही मोलाची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी पूर्ण क्षमतेने उपयोगात नव्हती. यातील बहुतांश बंधारे किरकोळ दुरुस्तीमुळे वापरात नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यांची आजची किंमत गृहीत धरल्यास शासनाची जवळपास 250 कोटीं पेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंधारण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री, केंद्रीय अधिकाऱ्यांची पथके यांच्याकडे करण्यात येत होती. विधी मंडळात देखील अनेकवेळा निधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
निती आयोगाने निवडलेल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या मार्फत बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निती आयोगाच्या निकषाप्रमाणे कृषि व जलसंधारणाच्या निर्देशकांची पुर्तता करण्यासाठी बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नसलेली करोडो रुपयांची मालमत्ता उपयोगात येवून  सिंचन क्षमतेत वाढ होईल. त्यामुळे यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाय योजनांचा विशेष कार्यक्रम 2018 अंतर्गत सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून रु. 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जलसंधारणमंत्री यांचे विशेष आभार मानले आहेत. 
*****